बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 | Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra 2025

बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 | Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra 2025

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरुन मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या… निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP) पुढीलप्रमाणे विहित करणेत येत आहे.

सदर  मान्यतेअंती प्रतयेक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत  संबंधित पात्र निवृत्तीवेतन धारक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर DBT in Cash प्रकाराने निवृत्ती  वेतन जमा होणार आहे. 

निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष :-

(अ) वयाची ६० वर्षे पुर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान १० वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजने अंतर्गत पात्र राहतील. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील.

(ब) पती/पत्नी च्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि, पती/पत्नी सदर योजने अंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.

(क) केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ (Employees State Insurance Act, १९४८) व कर्मचान्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतूदी कायदा, १९५२ (The Employees Provident Fund and Miscellaneous Provision Act. १९५२) अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत.

 निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण/दर :-

(अ) मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.

(ब) मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण / दर खालीलप्रमाणे राहील :-

Bandhkam Kamgar Pension Yojana

बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे :

 निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत :-

१. पत्त्याचा पुरावा आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत

२. जन्मतारखेचा पुरावा-जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित छायाप्रत

३. बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत

  •  संबधित प्रभारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छानणी करून “ निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र” (प्रपत्र-ब) सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी /नुतनीकरणाचा कालावधी असल्यास संबधित जिह्यामधून “वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र (प्रपत्र- क) संबधित प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे.
  •  मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबधित बांधकाम कामगारास “निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. (प्रपत्र- ड)

bandhkam kamgar pension yojana form pdf

अर्ज PDF डाउनलोड करा  येथे क्लिक करा 

 

अर्ज भरून  जमा करायचा पत्ता :

सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे (WFC) प्रभारी (कामगार उपायुक्त / सहायक कामगार आयुक्त / सरकारी कामगार अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.

अधिक माहितीसाठी योजनेचा GR वाचा 

Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra 2025 GR 

»येथे क्लिक करा «

Leave a Comment