कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 | kalyan dombivali mahanagarpalika recruitment 2025
गट-“क” व गट-“ड” मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात
kdmc recruitment apply online : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे.
तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाव्दारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट- “क” व गट-“ड” मधील एकूण ४९० पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १०/६/२०२५ पासून दि. ३ /७/२०२५ रोजी पर्यंत आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र व इच्छूक उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर दि.३/७/२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता |
- सर्व पदांची नावे आणि त्या त्या पदांची शैक्षणिक पात्रता (काही पदे १ ० वी उत्तीर्ण आणि काही पदवी वरती आहेत ) जाहिराती मध्ये सविस्तर दिले आहे. तरी खाली जाहिरात pdf दिलेली आहे ते पहा.
एकूण जागा |
- 490 जागा
नोकरी ठिकाण |
- कल्याण डोंबिवली
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख / Application last Date |
- 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येईल.
वयाची अट – Age Limit |
परीक्षा शुल्क |
आकारण्यात येणारे शुल्क
- खुला प्रवर्ग – रु. १०००/-
- मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – रु.900/-
- माजी सैनिक/दिव्यांग :- फी नाही
१) माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परिक्षा शुल्क माफ राहील.
२) फक्त ऑनलाईन पध्दतीनेच परिक्षा शुल्क भरावयाचे आहे.
३) उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
४) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रीया स्थगित / रद्य झाल्यास उमेदवारास पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही.
महत्वाच्या लिंक पहा | |
ऑनलाईन अर्ज करा | येथे |
जाहिरात pdf | Click Here |
अधिकृत वेबसाइट । KDMC Recruitment 2025 official website | पहा |