नगर रचना विभाग भरती 2025 ऑनलाईन अर्ज । nagar rachana vibhag recruitment 2025
nagar rachna vibhag bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर/ नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात, जाहिरात क्र.०२ / २०२४ अन्वये वर्तमान पत्रामध्ये व नगर रचना संचालनालयाच्या संकेतस्थळावर दि.१०.१०.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरहू जाहिरात प्रसिध्द केल्यानुषंगाने, समांतर आरक्षणानुसार दि.१५.१०.२०१४ रोजी सुधारित शुध्दीपत्रक नगर रचना संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. आता यापूर्वी | प्रसिध्द केलेली जाहिरात व शुध्दीपत्रक रद्द करण्यात येत असून, सुधारित जाहिरात पुढीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
post अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ आरेखक (गट क ) | २ ८ |
शैक्षणिक पात्रता । Essential Qualification |
शैक्षणिक अर्हता : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही (गट-क) समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. (समतुल्य शैक्षणिक अर्हता संचालनालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात | आलेल्या सर्वसाधारण सूचनांमध्ये नमूद करण्यात आली आहे.)
तांत्रिक अर्हता नामनिर्देशनाने उक्त पदावर नियुक्त करावयाच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (जी. आय.एस.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
परंतू, उमेदवाराने राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना (एनएसक्यूएफ) याच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास, त्याला मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (जी. आय.एस.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात येईल.
एकूण जागा |
- 28 जागा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख / Application last Date |
- 21 july 2025 पर्यंत अर्ज करता येईल.
वयाची अट – Age Limit |
१) उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
२) मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी / उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील. तसेच, दिव्यांग, भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ५५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील, शासन निर्णय क्र.मासैक- १०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दि.२०.०८.२०१० मधील तरतूदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील.
३) मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी आणि माजी सैनिक यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
परीक्षा शुल्क |
उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही.
- अराखीव (खुला) प्रवर्ग : 1000/-
- राखीव प्रवर्ग : 900/-
वेतन / Salary |
- 25500 – 81100/-
नोकरी ठिकाण – Job Location |
- पुणे, कोकण,नागपूर,नाशिक, औरंगाबाद , अमरावती विभाग
general instructions |
भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in. www.dtp.maharashtra.gov.in व https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरुन माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
महत्वाच्या लिंक पहा | |
dtp maharashtra recruitment 2025 ऑनलाईन अर्ज |
१ ९ तारीख पासून सुरु होतील |
dtp maharashtra recruitment 2025 जाहिरात pdf | Click Here |
अधिकृत वेबसाइट | पहा |